download

मुंबईतील मुलुंड भागात एका कारमध्ये प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. घरच्यांच्या विरोधामुळे दोघांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. या दोघांनी विषप्राशन करून गाडीतच आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. भिन्न धर्माचे असल्याने या दोघांच्या विवाहाला त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता, अशी माहितीही पुढे येत आहे.
सलमान अफरोज आलम खान (२६) आणि मनीषा नेगी (२१) अशी दोघांची नावे आहेत. सलमान मुलुंड पश्चिमेकडील अशोक नगर येथे तर मनीषा नवी मुंबईतील दिघा येथे राहत होती. सलमान आणि मनीषा भांडुपच्या महाविद्यालयात शिकले. गेल्या चार वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्याबाबत दोघांच्याही पालकांना माहिती होती. मात्र धर्म भिन्न असल्याने पालकांना हे संबंध अमान्य होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *