monsoon-1

मुंबईमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता – हवामान विभाग

मुंबई

केरळात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळल्या. आता ६,७,८ आणि ९ जून हे चारही दिवस तुफानी पावसाचे असतील असा
अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे.येत्या काळात पाऊस किती असेल, याची झलक काल मुंबईत झालेल्या अर्ध्या तासाच्या पावसातच पाहायला मिळाली. आता ,८ आणि ९ तारखेला मुंबईमध्ये अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे येत्या २४ तासात दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *