IMG-20180604-WA0017.jpg

खासदार नारायण राणे यांचे चिपळूण नगरीत जंगी स्वागत..!

कोकण

चिपळूण – कुमार चव्हाण

दै.सागरचे संपादक स्व. निशिकांत तथा नाना जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त चिपळूणला रवाना होत असताना माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांचे राजापूर, लांजा, रत्नागिरी, चिपळूण येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
खासदार झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे प्रथमच चिपळुणात येणार असल्याचे कळताच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकत्यांनी अभिरुची हॉटेल येथे त्यांच्या स्वागताची तयारी केली होती. सकाळी ११ वाजल्यापासून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे चिपळूण मध्ये उपस्थित होते. यावेळी संघर्ष समिती पेढे परशुरामच्या वतीने तसेच दलवटणे-पिंपळी पुलासंदर्भात त्यांना निवेदने देण्यात आली. तसेच कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्थानी त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. अनेक गावांतील ग्रामस्थांनी येऊन माजी खासदार निलेश राणे यांच्याशी चर्चा केली. सकाळपासूनच पदाधिकारी व कार्यकर्ते अभिरुची हॉटेल येथे थांबले होते. सायंकाळी ५.३० वाजता खा. नारायण राणे यांचे चिपळूण नगरीत आगमन झाले.
यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.मेघना शिंदे, ज्येष्ठ नेते मंगेश शिंदे, तालुकध्यक्ष अजय साळवी, शहराध्यक्ष परिमल भोसले, नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे, नगरसेविका वर्षा जागुष्टे, संजीवनी शिगवण, सफा गोटे, नगसेवक करामत मिठागरी, आशिष खातू, खेड तालुकाध्यक्ष सचिन घाडगे, गुहागर तालुकाध्यक्ष आनंद भोजने, यांनी त्यांचे स्वागत केले. तर संघर्ष समिती पेढे परशुराम यावेळी संघर्ष समिती पेढे-परशुरामचे अध्यक्ष विश्वास सुर्वे, सचिव सुधीर गमरे, सुरेश बहुतले, बबन पडवेकर, रघुनाथ माळी, विद्याधर गमरे, संतोष पानकर, जनार्दन मालवणकर, आत्माराम कदम, प्रकाश काजवे, प्रमोद माळी, बबन मालवणकर ,महाराष्ट्र स्वाभिमान रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष विलास इंगावले, हरिश्चंद्र रहाटे, बापू राऊत, उत्तम मोरे, संजय किंजळकर, सुधीर पानकर, वसंत देवधर, प्रवीण सावंत, योगेश इंगावले, मिलिंद पात्रे, इदायत चौगुले, अशोक इंगावले, दत्ताराम इंगावले, रामचंद्र इंगावले, शंकर इंगावले, बाबाजी इंगावले, अनंत गोसावी, अरुण पवार, विलास इंगावले, अजय इंगावले, यशवंत इंगावले, संतोष सुतार, योगेश इंगावले, सिध्देश पवार, सौरभ इंगावले, चंद्रकांत इंगावले, मोहन गोसावी, कृष्णा साबळे तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संतोष खैर, संदेश भालेकर, महेश कांबळी, प्रफुल्ल पिसे, कुंदन खातू, आकाश पवार, शौर्य निमकर, सौ. रसिका काजारे, सनी मयेकर, अभिषेक जागुष्टे, अमिर कुटरेकर, दिलावर फकीर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *