keepcalmandhandleexams-18-1476809719-24-1487929454

सीतेला कोणी पळवलं? गुजरातच्या पाठ्यपुस्तकात घोडचूक

देश

सीतेचं अपहरण कोणी केलं ? असा प्रश्न विचारला तर लहान मूलसुद्धा रावण असं योग्य उत्तर देईल. मात्र गुजरातमध्ये बारावीच्या संस्कृत पुस्तकात या साध्या प्रश्नाचं उत्तर चुकवण्यात आलं आहे. रावणाने नाही तर रामाने सीतेचं अपहरण केल्याचं पुस्तकात छापण्यात आलं आहे.ज्यावरुन रामायण घडलं, त्यातील मुख्य बाबच गुजरात बोर्डाने चुकवल्याने, त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
सीतेला रावणाने पळवलं हे पूर्वापार ऐकत-वाचत आलेलो आहे. मात्र गुजरात बोर्डाच्या बारावीच्या संस्कृतच्या पुस्तकात सीतेला चक्क प्रभू रामाने पळवल्याचं म्हटलं आहे.
या पुस्तकातील १०६ नंबरच्या पानावर याबाबतचा उल्लेख आहे. “संस्कृत साहित्याची ओळख” यामध्ये अनेक चुका आहेत.
“रामाचे विचार कवीने अत्यंत उत्तमरित्या मांडले आहेत. सीतेला जेव्हा रामाने पळवलं, तेव्हा लक्ष्मणाने रामाला दिलेल्या हृदयस्पर्शी संदेशाचं वर्णन केलं आहे” असं या पुस्तकात म्हटलं आहे.
दरम्यान, ही भाषांतर चूक असून रावणाऐवजी चुकून राम झाल्याचं स्पष्टीकरण गुजरात बोर्डाने दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *