MSRTC-22

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी ‘एसटी’ तीचा आज वाढदिवस

महाराष्ट्र

ज्या परिवहन महामंडळाची लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्‍य घेऊन रस्त्यावर धावते आहे. चालक, वाहक व अन्य कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू झाले, त्याला आज ७० वर्षे पूर्ण होत आहेत. १ जून १९४८ रोजी अहमदनगर – पुणे मार्गावर पहिली एसटी बस धावली. या सत्तर वर्षाच्या प्रवासात एसटीनं अनेक उन्हाळे , पावसाळे अनुभवले. सव्वा लाख कर्मचारी हा एसटीचा एक अविभाज्य भाग आहे. या सत्तर वर्षाच्या कालावधीत सरकार बदलले, तसे तसे एसटीचे रंग बदलत गेले.एसटीची रचनाही बदलत गेली.
तीन जण बसणाऱ्या सीटवर आता दोन प्रवासी बसतील अशी टू बाय टू पुश बॅक सीट आले. अनेक विविध रंगात आज एसटी आपल्याला दिसते. सव्वा लाख कर्मचाऱ्यांच्या परिवाराची जबाबदारी एसटी आजदेखील स्वत: पेलत आहे.
एसटी महामंडळाचा कारभार ३५ बसेस्‌वर सुरू झालेला होता. आज १८ हजार बसेस्‌ आणि सव्वा लाख कर्मचाऱ्यांपर्यंत विस्तारला आहे. २४० आगार आणि सात विभागांतून राज्यातील लाखो प्रवाशांना एसटीची लालपरी मुक्कामाला पोहचवत आहे. शिक्षणापासून उपचारापर्यंतच्या धावाधावीसाठी आणि गावच्या जत्रेपासून आषाढी-कार्तिकीच्या वारीपर्यंत एसटी आणि तिचे कर्मचारी अहोरात्र सेवेत आहेत, हे एसटीचे निर्विवाद सत्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *