monsoon-1

पुणे शहरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

महाराष्ट्र

आज सायंकाळी पुणे शहरात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली.पिंपरी-चिंचवड गारांसह शहरात मान्सूनपूर्व पावसाने आज (शुक्रवारी) सायंकाळी जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना आणि वादळीवाऱ्यासह शहरातील विविध भागात झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. नागरिकांना उकाडा जाणवत होता. सायंकाळी पावणेचार वाजताच्या सुमारास गारांसह पाऊस सुरू झाला. पावसाच्या दमदार हजेरीने नागरिक सुखावले आहेत. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
दरवर्षी मान्सून केरळमध्ये एक जूनला धडकतो. मात्र, यंदा दोन ते तीन दिवस आधीच 28 मेला केरळात दाखल झाला आहे. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर पुढील 24 तासात त्याची वाटचाल दक्षिण-अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्वीप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडीचा परिसरात होते. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारण पुढच्या सात दिवसांत तो महाराष्ट्रात धडकतो. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी वातावरण अनुकूल असल्याने राज्यातही मान्सूनचं वेळेत आगमन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *