lifetime hospital

सिंधुदुर्ग येथील लाईफ टाईम हाॅस्पिटलमध्ये पार पडली मेंदुवरील सर्वात मोठी यशस्वी शस्त्रक्रिया

कोकण महाराष्ट्र

सिंधुदुर्गात नुकतेच लोकार्पण झालेले लाईफ टाईम सुपरस्पेशालिस्ट हाॅस्पिटलमध्ये काल मेंदुवरील शस्त्रक्रिया पार पडली. सदर रूग्ण हा कणकवलीमधील शेळके हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत होते.उपचार सुरू असतानाच ते कोमात गेले. डाॅक्टर शेळके यांनी काही क्षणातच आधुनिक तंत्रज्ञान आणि मशिनरीनी युक्त अशा लाईफ टाईम हाॅस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला त्यानंतर हाॅस्पिटलची काॅर्डियाॅक अॅम्बुलन्सने हाॅस्पिटल मध्ये दाखल करून हाॅस्पिटलमधील प्रतिथयश डाॅक्टर यांच्याकडून मेंदुवरील यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांनी राणे कुटूंबीयांचे आणि लाईफ टाईम  हाॅस्पिटलच्या संपूर्ण डाॅक्टरांच्या टीमचे मनापासून आभार आणि समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *