images (1)

धक्‍कादायक ! माणगावमध्ये ८ वर्षीय मुलीची हत्‍या

कोकण

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे सात वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून राजकीय वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दिया जाईलकर या सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह अखेर सापडला असून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. या हत्येच्या निषेधार्थ आज (मंगळवारी) माणगावमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.
माणगावमधील वावे गावात राहणारी दिया जाईलकर ही मुलगी २५ मेला संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास दुकानातून काही वस्तू आणायला घराबाहेर पडली होती. मात्र बराच वेळ झाला तरी दिया घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात दिया बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली.
सोमवारी संध्यााकाळी साडे सातच्या सुमारास दियाचा मृतदेह गावातीलच बंद घरात सापडला. वावे गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दियाची आई नुतन जाईलकर या बिनविरोध निवडून आल्या होत्या. मंगळवारी याबाबतची अधिकृत घोषणाही होणार होती. या निवडणुकीच्या रागातूनच दियाची हत्या केल्याचा संशय आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वावे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *