1200px-IRCTC_Logo.svg

आता ‘आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर नवीन फिचर्स, कळणार तिकीट कन्फर्म आहे की नाही

देश

आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर आता नवीन फिचर्स येणार असून यात वेटिंग लिस्ट किंवा आरएसी तिकिटांची कन्फर्म होण्याची शक्यता देखील कळणार आहे.
रेल्वे तिकिटांचे ऑनलाइन आरक्षण करण्यासाठी ‘आयआरसीटीसी’ (www.irctc.co.in) या वेबसाईटचा वापर प्रामुख्याने केला जातो. दररोज ९ लाख तिकिटांची बुकींग वेबसाईटवरुन होते. या वेबसाईटच्या डिझाईन आणि फिचर्समध्ये २०१४ साली किरकोळ बदल झाले होते. पण ही वेबसाईट सरकारी असल्याचा अनुभव वारंवार येत होता. वेबसाईटची मांडणी आणि रंगसंगतीही फारशी आकर्षक नव्हती. वेबसाईट आणखी आकर्षक आणि तितकीच युजर फ्रेंडली राहावी, यावर आता भर देण्यात आला आहे.

आता काही नवीन फिचर्सही वेबसाईटवर आले आहेत. युजर्ससाठी तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता सांगणारे फिचर हे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रवाशांना तिकीट वेटिंग लिस्ट किंवा आरएसीमध्ये असेल तर ते कन्फर्म होण्याची शक्यता आहे का, याचा अंदाज येणार आहे. हा अंदाज प्रत्यक्ष परिस्थिती आणि त्या काळातील गर्दी या आधारे वर्तवला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *