hsc_20180591109

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (बुधवारी) जाहीर होणार असून दुपारी १ पासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येतील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी- मार्च २०१८ मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमध्ये सुमारे दोन हजार ८२२ परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार तर वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यानी परीक्षा दिली आहे.
बारावीचा निकाल http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर पाहता येणार आहे.ऑनलाइन निकालानंतर लगेलच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक त्या अर्जाचा नमुना आणि तपशील बोर्डाच्या वेबसाईटवर देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *