DeVTVaAV4AEbfeb

मुंबईत मालाड स्टेशनबाहेरील प्रसिद्ध ‘एम एम मिठाईवाला’ दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाच्या  १६ गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.
मालाड रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला एम एम मिठाईवाला हे दुकान आहे. या दुकानाच्या बाजुलाच अनेक मिठाईची दुकाने आहेत. सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान अचानक या दुकानात आग लागली. आगीचे कारण समजू शकलेले नाही. पण यामुळे दुकानाचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. मार्केट परिसर असल्यामुळे या भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे.
एम.एम. मिठाईवाला दुकानाला लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. आगीचं कारणही अद्याप अस्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *