290600-railway

सीएसएमटी रेल्वे स्टेशनमध्ये आग

मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनमध्ये आग लागली असल्याची माहिती मिळत आहे. यार्डमध्ये उभ्या असलेल्या एक्स्प्रेसच्या डब्याला ही आग लागली आहे. सुदैवाने एक्स्प्रेस मोकळी असल्या कारणाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुरुवातीला ही आग रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १८ वर आग लागली असल्याचं सांगण्यात येत होतं. पण ही आग फलाटावरील एक्स्प्रेसच्या रिकाम्या डब्याला लागली नसून यार्डमध्ये लागली असल्याचं मध्य रेल्वेने स्पष्ट केलं आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *