_0b2aec34-6280-11e8-b5ac-da6b7874835f

सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुचर्चित ‘काला’चा ट्रेलर प्रदर्शित

मनोरंजन

सुपरस्टार रजनीकांत यांच्या चाहत्यांना ज्या चित्रपटाची उत्सुकता होती त्या कालाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. काला कारिकलन या मुख्य भूमिकेत असणारे अभिनेते रजनीकांत यांची जादू या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, या चित्रपटात रजनीकांत यांना अभिनेते नाना पाटेकर तगडी टक्कर देताना दिसत आहेत. एका राजकारण्याच्या भूमिकेत असलेले नाना ट्रेलरच्या सुरुवातीला लोकांना संबोधित करताना दिसत आहेत. हा चित्रपट एका गँगस्टरच्या आयुष्यावर बेतला असून ही भूमिका खुद्द रजनीकांत करणार आहेत. नाना आणि रजनीकांत यांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहता येईल. या खेरीज चित्रपटामध्ये हुमा कुरेशी आणि एस्वरी राव यांच्याही मूख्य भूमिका असणार आहेत.
रजनीकांत यांचा जावई आणि अभिनेता धनुष याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर रंजीत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.या चित्रपटात दोन मोठे कलाकार असल्याने चाहत्यांमध्ये त्याची फारच उत्सुकता आहे. पीए.रंजित दिग्दर्शित हा चित्रपट ७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *