capture_2868570_835x547-m

CBSE 10th result 2018 : दुपारी 4 वा.

शिक्षण

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आज दुपारी 4 वाजता सीबीएसईच्या 10 वी च्या परीक्षेचा निकाल वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.
cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in. या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.
यंदा सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेला 10 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यांचा आज निकाल जाहीर होईल.
विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटसह cbseresults.nic.in, results.nic.in आणि results.gov.in वर पाहता येणार आहे.
तसंच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मायक्रोसॉफ्टने एक खास अॅप बनवलं असून विद्यार्थी तिथे आपला निकाल पाहू शकतात.
याशिवाय मेसेजद्वारेही तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. दहावीच्या निकालासाठी मेसेज बॉक्समध्ये जा. तिथे cbse10 <rollno> <sch no> <center no> लिहा आणि 7738299899 ह्या नंबरवर पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *