images

ड्रायव्हरला मदत करताना झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू

महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर झालेल्या विचित्र अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अनिल मुंगसुळे(४० वर्ष) असे या व्यक्तीचे नाव असून त्यांची काहीही चूक नसताना त्यांचा जीव गेला. सोमवारी रात्री दीड वाजता ही दुर्घटना घडली.
पुण्याहून मुंबईला येत असताना मुंगसुळे ज्या गाडीतून प्रवात करत होते त्या गाडीचा टायर पंक्चर झाल्याने ड्रायव्हरने सर्व्हीस रोडवर नेऊन गाडी थांबवली. तो पंक्चर झालेलं चाक बदलण्यासाठी प्रयत्न करत असताना मुंगसुळे त्याचा मदतीसाठी खाली उतरले. टायर बदलत असताना गाडीच्या पाठच्या बाजून रिफ्लेक्टरचा त्रिकोण ठेवायला ड्रायव्हर विसरला होता तसंच पार्कींग लाईटची सुरू केला नव्हता. या गाडीच्या मागून येणाऱ्या टेम्पोला रस्त्यात उभी असलेली ही गाडी न दिसल्याने त्याने या गाडीला आणि मुंगसुळेंना जबरदस्त धडक दिली. यामध्ये मुंगसुळेंचा जागीच मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *