a85ece3ad936bc6649cbd5f08e8286d3

‘राजी’ ठरला आलिया भट्टचा सर्वात मोठा हिट चित्रपट

मनोरंजन

मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवरचे सगळे विक्रम मोडीत काढले आहे. हा चित्रपट केवळ मेघना गुलजार यांचाच सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला नाही तर या चित्रपटाची लीड अ‍ॅक्ट्रेस आलिया भट्ट हिचा आत्तापर्यंतच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपट ठरला आहे.
आलिया आणि विकी कौशल यांची मुख्य भूमिका आणि दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी आपल्या शैलीत ‘राझी’ची कहाणी प्रेक्षकांसमोर आणली. १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धासंदर्भात ही कथा आहे. ज्यात एका भारतीय गुप्तचराला आपल्या देशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाहीत. गेल्या काही काळात आलेल्या महिला प्रधान चित्रपटांमध्ये राझीनं जवळजवळ सगळेच विक्रम मोडीत काढले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *