bsnl

टेलिकॉम सेक्टरमध्ये रामदेव बाबांचा प्रवेश

व्यापार

योगगुरु बाबा रामदेव यांनी टेलिकॉम सेक्टरमध्ये एंट्री केली आहे. रविवारी एका इव्हेंटमध्ये बाबा रामदेव यांनी सिम कार्ड लाँच केले. या सिमकार्डला स्वदेशी समृद्धी सिम कार्ड हे नाव देण्यात आले आहे. हे कार्ड पतंजलि आणि भारत संचार निगम लिमिटेड(बीसएनएल) यांनी एकत्रित मिळून लाँच केले. दरम्यान, हे सिमकार्ड केवळ पतंजलिच्या कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. यात तुम्ही १४४ रुपयांचा रिचार्ज केल्यास युझरला २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यासोबतच या सिमद्वारे पतंजलिच्या उत्पादनांवर १० टक्के डिस्काऊंटही मिळणार आहे.
१४४ रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. त्यासोबतच २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस सुविधाही देण्यात आली आहे. सध्या फक्त पतंजली कर्मचाऱ्यांसाठी हे सिम लाँच केले आहे, पण जेव्हा हे सर्वसामान्यांसाठी लाँच केले जाईल तेव्हा या सिमवरुन पतंजली उत्पादनांवर १०% सूट दिली जाणार आहे. या सिमच्या यूजरला २.५ लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल लाइफ इन्शुरन्स आणि ५ लाख रुपयापर्यंतचे लाइफ लाइफ इन्शुरन्स दिले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *