Maharashtra-Vidhan-Bhavan

विधानपरिषद निवडणूक निकाल 2018

राजकीय

विधान परिषद निवडणुकीत कोकणात शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या ठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची भूमिका निर्णायक ठरली.त्यामुळे राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे विजयी झालेत. शिवसेनेचे उमेदवार राजीव साबळे यांचा पराभव झाला.
कोकणात सुनील तटकरेंचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शिवसेनेचे राजीव साबळे यांचा पराभव केला. तिकडे अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर मोठा विजय मिळवला आहे. वर्धा-चंद्रपूरमध्ये भाजपचे रामदास आंबटकर यांचा विजय झाला.
दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेनेचे दराडे विजयी झाले आहेत. तर परभणी-हिंगोलीत शिवसेनेचे विप्लव बाजोरीया यांनी बाजी मारली. तर दुसरीकडे अमरावतीत काँग्रेसला धक्का देत भाजपच्या प्रवीण पोटेंनी बाजी मारली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *