Samsung-Galaxy-S-Light-Luxury-507x507

सॅमसंगचा Galaxy S Light Luxury स्मार्टफोन लाँच

व्यापार

सॅमसंगने Galaxy S Light Luxury हा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. S लाइट हा S8चं मिनी व्हर्जन आहे.गॅलक्सी S लाइट हा चीनमधील JD.com या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची किंमत 3,999 युआन (जवळपास 40,000 रुपये) आहे.
ड्युल सिम कार्ड असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉईड 8.0 ओरिओ ओएसवर आधारित आहे. यामध्ये 5.8 इंच स्क्रिन असून यांचं रेझ्युलेशन 1080×2220 पिक्सल आहे. यामध्ये 2.2 GHz क्वॉड कोअर स्नॅपड्रगन 660 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

यासोबतच वायफाय, जीपीएस, तसंच 3000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये वायरलेस चार्जिंग देखील देण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *