devendra-2

भाजपात येण्यासाठी खूप लोक रांगेत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निरंजन डावखरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपात येण्यासाठी खूप लोक रांगेत आहेत असं सूचक विधान केलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण पदवीधर संघाची उमेदवारी निरंजन डावखरेंना जाहीर केली आहे. निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना समाजातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व चांगल्या लोकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच आम्ही निरंजन डावखरेंना सोबत घेतलं असल्याचं सांगितलं. राष्ट्रीय पक्षात येण्याची त्यांची इच्छा होती. आमचीही त्यांनी सोबत यावी अशी इच्छा होती. आमचं तसं बोलणं झालं असल्याचंही त्यांनी म्हटलं. तरुण तडपदार नेतृत्व मिळाल्याने भाजपाला फायदा होईल. मोलाचा सहभाग मिळेल, एक चांगलं नेतृत्व मिळेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *