Andre-Russell-Kolkata-Knight-Riders-KKR-IPL-2018-770x433

राजस्थानवर कोलकात्याची मात, क्वालिफायर-2 मध्ये धडक

क्रीडा

कर्णधार दिनेश कार्तिकने केलेली शानदार फलंदाजी. आंद्रे रस्सेलने अखेरच्या षटकांमध्ये केलेली घणाघाती फलंदाजी. अन् लेगस्पिनर पियूष चावला व डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांनी केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने बुधवारी झालेल्या आयपीएलच्या इलिमिनेटर लढतीत राजस्थान रॉयल्सवर २५ धावांनी दमदार विजय मिळवला आणि अंतिम फेरीत पोहोचण्याचे आव्हान कायम राखले. आता २५ मे रोजी होणाऱ्या क्वॉलीफायर टू लढतीत त्यांच्यासमोर सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्सकडून मिळालेल्या १७० धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला ४ बाद १४४ धावाच करता आल्या. कोलकाता नाईट रायडर्ससाठी पियूष चावलाने २४ धावा देत दोन फलंदाज बाद केले, तर कुलदीप यादवने चार षटकांमध्ये अवघ्या १८ धावा देत एक फलंदाज बाद केला. दरम्यान, याआधी दिनेश कार्तिकने ३८ चेंडूंत दोन षटकार व चार चौकारांनिशी ५२ धावांची खेळी साकारली. शिवाय अष्टपैलू खेळाडू आंद्रे रस्सेल याने फक्त २५ चेंडूंमध्येच पाच खणखणीत षटकार व तीन चौकारांसह नाबाद ४९ धावा फटकावल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *