crime cuffs_0

धक्कादायक ! दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून तरुणाचा खून

महाराष्ट्र

केवळ दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून तरुणाचा खून करणाऱ्या तिघांना चिकलठाणा पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
९ मे रोजी वरूड काजी फाट्याजवळ रात्री १२ वाजेच्या सुमारास वरुड काजी येथील रहिवासी शेतकरी तरुण नंदू लक्ष्मण दांडगे (३५) याची पळशी या गावातील तीन तरुण कल्याण तात्याराव पळसकर (२७), त्याचा भाऊ अमोल पळसकर (२३) आणि गणेश सीताराम ढगे (२२) यांनी मोटार सायकल अडवली आणि दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्यांनी नंदू दांडगे याच्यावर चाकूने सपासप वारही केले.गंभीर जखमी झालेल्या नंदू दांडगे याला घाटीच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार चालू असतानाच १४ मे रोजी त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *