64242573

सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.पेट्रोल आणि डिझेलमध्ये 30 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलने 86 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल- डिझेल महाराष्ट्रात आहे. यामध्येही अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल आहे. अमरावतीत पेट्रोल 86.22 रुपये तर डिझेल 73.94 रुपये आहे. त्याखालोखाल सिंधुदुर्गात पेट्रोल 86.01 रुपये तर डिझेल 72.69 रुपये प्रति लिटर आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 85.93 रुपये तर डिझेल 73.73 रुपये आहे. मुंबईतील पेट्रोलचा दर 85 रुपये तर डिझेल 72 रुपये 66 रुपयांवर पोहोचलं आहे.
गेल्या 10 दिवसांमध्ये दररोज इंधनाचे दर वाढले आहेत. सलग दहाव्या दिवशी इंधनाचे दर वाढले असताना, मोदी सरकार यावर तोडगा काढणार का याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *