dc-Cover-652ovhkibhg82kh6on274ihkn1-20180220010751.Medi

मोबाईल काढून घेतल्याने मुलीची आत्महत्या

मुंबई

नालासोपारा भागात एका मुलीने वडिलांशी मोबाईलसाठी झालेल्या भांडणानंतर विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. मुलीच्या वडिलांनी तिचा फोन काढून घेतल्याने रागाच्या भरात ती घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर पोलिसांनी तिची शोधाशोध केली असता तिचा मृतदेह शंकराच्या मंदिराजवळील विहिरीत आढळून आला आहे. श्रद्धा ढवळे (२२) असे त्या मुलीचे नाव होते.
श्रद्धा ही तिच्या कुटुंबासोबत नालासोपारात राहायची. तिचे वडील मंगेश ढवळे हे एका खासगी रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून कामाला होते. श्रद्धा ही सतत तिच्या मित्र मैत्रिणींशी फोनवर चॅटिंग करायची त्यामुळे बऱ्याचदा तिचे तिच्या वडिलांशी खटके उडायचे. मंगेश हे सतत श्रद्धाला मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास कर म्हणून सांगायचे. सोमवारी श्रद्धा तिच्या एका मित्रासोबत चॅट करत असताना तिच्या वडिलांनी तिचा फोन काढून घेतला व ते पुन्हा त्यावरून तिला बडबडू लागले. त्यानंतर श्रद्धा वडिलांशी भांडून घरातून निघून गेली. बराच वेळ झाला म्हणून श्रद्धा परतली नाही म्हणून तिच्या पालकांनी शोधाशोध करायला सुरुवात केली. मात्र श्रद्धा न सापडल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली असता श्रद्धाचा मृतदेह विहिरीत आढळून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *