CHICAGO, IL - MAY 27:  Crime scene tape is stretched around the front of a home where a man was shot on May 28, 2017 in Chicago, Illinois. Chicago police have added more than 1,000 officers to the streets over the Memorial Day weekend, hoping to put a dent in crime, during what is typically one of the more violent weekends of the year. In 2016, 6 people were killed and another 65 were wounded by gun violence over the Memorial Day weekend.  (Photo by Scott Olson/Getty Images) ORG XMIT: 700056549

मोबाईल नंबर मागणाऱ्या तरुणाची दाम्पत्याकडून हत्या

मुंबई

पत्नीचा मोबाईल नंबर मागत असल्याच्या कारणावरुन पतीसह पत्नीने युवकाला मारहाण केली. या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना चेंबुरमध्ये घडली. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी आरोपी दाम्पत्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
चेंबुर येथील व्ही के कृष्णन मेनन चाळीत आरोपी पती यशवंत रामू झाडे आणि पत्नी मीना यशवंत झाडे राहतात. याच चाळीत राहणारा राकेश शिंदे हा मीना झाडे यांच्याकडे वारंवार मोबाईल नंबर मागत असे. याबद्दल मीनाने आपल्या पतीला सांगितलं. चिडलेल्या यशवंतने राकेशच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली. राकेश बेशुद्ध पडल्यामुळे नातेवाईकांनी त्याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. टिळक नगर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी आरोपी पती पत्नीला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *