RR-vs-KKR-6

राजस्थानपुढे केकेआर संघाचे कडवे आव्हान

क्रीडा

आयपीएलच्या रणांगणात आज प्ले ऑफचा एलिमिनेटर सामना ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा मुकाबला राजस्थान रॉयल्सशी होईल.
या सामन्यातल्या पराभूत संघाचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात येईल. तर जो संघ जिंकेल त्याचा मुकाबला फायनलच्या तिकिटासाठी सनरायझर्स हैदराबादशी होईल. त्यामुळं या सामन्यात चुरशीचा खेळ पाहायला मिळेल.
नाईट रायडर्सने यंदाच्या मोसमात आतापर्यंत दोन्ही सामन्यांत राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. गेल्या महिन्यात जयपूरमध्ये सात गडी राखून पराभूत केल्यानंतर या आठवड्यापूर्वी ईडनगार्डन्सवर ६ गडी राखून पराभव केला आणि प्लेआॅफमध्ये स्थान निश्चित केले. सलग तीन विजय मिळवणाºया केकेआर संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. त्यांनी सहाव्यांदा अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे.
दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील संघाने मजबूत गोलंदाजी आक्रमण असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गेल्या लढतीत स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. चारही क्वालिफायर संघांमध्ये नशिबाने गृहमैदानावर खेळण्याची संधी लाभलेला केकेआर एकमेव संघ आहे. बुधवारच्या लढतीतील विजेता संघ सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यापैकी एका संघासोबत दुसºया क्वालिफायरमध्ये खेळेल. ही लढतही कोलकातामध्येच होणार आहे. त्यातून अंतिम फेरी गाठणारा दुसरा संघ निश्चित होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *