3Online_Permission_12

मुंबईतील अकरावीच्या प्रवेश क्षमतेमध्ये वाढ

मुंबई

यंदा मुंबई आणि उपनगरांमधील अकरावीच्या प्रवेश क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये नव्या 14 महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये 9 हजार 670 जागा वाढणार आहेत. गेल्या वर्षी (2017-18) मुंबईमध्ये अकरावीची प्रवेश क्षमता 2 लाख 92 हजार 90 इतकी होती. यंदा ती 3 लाख 1 हजार 760 इतकी असेल.
मुंबईतील विद्यार्थ्यांचा गेल्या काही वर्षांचा प्रवेशाचा कल पाहता, वाणिज्य (कॉमर्स) शाखेच्या जागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. कॉमर्सच्या 4 हजार 460 जागा वाढल्या आहेत. विज्ञान शाखेच्या 3 हजार 760 जागा तर कला शाखेच्या 1 हजार 140 जागा वाढल्या आहेत. किमान कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रमाच्या (एमसीव्हीसी) 110 जागा वाढल्या आहेत. त्यामुळे यंदा एकूण 800 महविद्यालयात 11 वी विद्यार्थ्यांचे प्रवेश मुंबई विभागसाठी केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *