1fc4c91ad0891e2c2a185e8fd19b73a6

महाराष्ट्रातील आमदारांवर अतिरेकी हल्ला

देश

महाराष्ट्राचे पाच आमदार अतिरेक्यांच्या हल्ल्यातून बचावले. अतिरेक्यांकडून या आमदारांवर ग्रेनेड हल्ला झाला आहे, पण सुदैवाने हे आमदार बचावले आहेत. पंचायत राज समिती अभ्यास दौरा निमित्त हे आमदार १९ मे पासून, हे आमदार जम्मू काश्मीरमध्ये गेले आहेत. किशोरआप्पा पाटील -पाचोरा विधानसभा (जळगाव), सुधीर पारवे – उम्रेड विधानसभा (नागपूर), विक्रम काळे – (शिक्षक आमदार ), दीपक चव्हाण – विधानसभा फलटण, (सातारा ) तुकाराम काते – मानखुर्द मुंबई, (शिवसेना) जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे हा हल्ला झाला. हे आमदार प्रवास करताना, दहशतवाद्यांनी त्यांच्या गाड्यांवर गोळीबार केला, यानंतर ग्रेनेड हल्ला देखील केला, तसेच ड्रायव्हर आणि सुरक्षेसाठी असलेल्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत, त्यांना सुरक्षित स्थळी नेल्याने, मोठी अनर्थ टळला आहे.
हे सर्व आमदार सुखरूप आहेत, इतर रस्त्यावरील इतर ७ ते ८ जण जखमी आहेत, विधानसभा अध्यक्षांनी याबाबतीत माहिती दिली आहे, तसेच या आमदारांचे कुटुंबीय़ देखील सुरक्षित बचावले आहेत. या आमदारांना आणखी अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे. आमदार जेव्हा सुरक्षित स्थळी गेले तेव्हा गोळीबाराने टायर फुटला होता, पोलिसांच्या गाडीवर देखील गोळीबार झाला होता. ही माहिती आमदार विक्रम काळे यांनी दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *