AB-de-Villiers-0072

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डीविलियर्सने आंतरराष्टीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकापूर्वी डी’व्हिलियर्सने हा निर्णय घेतल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही हा मोठा धक्का असेल.
” सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते. पण निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटले, ” असे डी’व्हिलियर्सने सांगितले.
एबी डीविलियर्सने दक्षिण आफ्रिकेडून ११४ कसोटीत ५०.६६च्या सरासरीने ८७६५, वनडेत २२८ सामन्यात ५३.५च्या सरासरीने ९५७७ तर टी२०मध्ये ७८ सामन्यात २६.१२च्या सरासरीने १६७२ धावा केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *