petrol-1-1

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी गाठला नवा उच्चांक

देश

कर्नाटकच्या निवडणुकीमुळे केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारने काही काळ रोखून धरलेली इंधन दरवाढ निकालानंतर लागू केल्यामुळे देशभरात पेट्रोल- डिझेलच्या दराने उच्चांक गाठला.मंगळवारी मुंबईत पेट्रोलच्या किमतीने उच्चांक गाठला असून पेट्रोलने लिटरमागे ८४. ७३ रुपयांचा आकडा गाठला. तर डिझलेने लिटरमागे ७२. ५३ रुपयांचा आकडा गाठला आहे.
पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने महागाई देखील वाढणार आहे. तर दुसरीकडे पेट्रोल- डिझेल दरवाढीवरुन विरोधकही आक्रमक झाले असून सोशल मीडियावरही मोदी सरकारवर टीका सुरु आहे.कर्नाटकच्या निवडणुकीमुळे केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारने काही काळ रोखून धरलेली इंधन दरवाढ निकालानंतर लागू केल्यामुळे देशभरात पेट्रोल- डिझेलच्या दराने उच्चांक गाठला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *