thr-jungle-book-759

‘मोगली’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मनोरंजन

‘जंगल जंगल बात चली है पता चला है…’ हे गाणं कुठेही वाजू लागलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर बालपणीच्या आठवणी उभ्या राहतात. आठवणी एका अशा मित्राच्या ज्याचं आयुष्य जंगलाच्या सानिध्ध्यात गेलं आणि ज्याने प्राण्यांनाच चक्क आपल्या मित्रत्वं दिलं. ‘जंगल बुक’ म्हणा किंवा ‘मोगली’, ही कथा आजही अनेकांना जवळची वाटणारी आणि तितकीच भावणारी. अशी ही गोष्ट आता एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अँडी सर्किस दिग्दर्शित ‘मोगली’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे.
जवळपास अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये बघीरा, भालू यांची झलक पाहायला मिळतेय. त्यासोबतच जंगलामध्ये असणारे प्राण्यांचे वेगळे असे नियम आणि त्यांना सामोरा जाणारा मोगली या सर्व गोष्ट पाहता नव्या अंदाजातील हे ‘जंगल बुक’ सर्वांचच लक्ष वेधत आहे. ‘हे जंगल आता तुझ्यासाठी सुरक्षित नाही….’ असं म्हणणारा बघीरा आणि मोगलीवर नजर ठेवणारा शेरखान ही सर्व पात्र या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही कथा प्रेक्षकांपर्यंत घेऊन येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *