289453-nipa

निपाह व्हायरसचं संकट, केरळमध्ये ६ जणांचा मृत्यू

देश

भारतात निपाह व्हायरसच्या रुपाने नवं संकट समोर उभं राहिलं आहे. या व्हायरसची लागण झाल्याने केरळच्या कोझिकोडमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जणांवर उपचार सुरु आहेत. चिंतेची बाब म्हणजे, या विषाणूवर कोणताही उपचार होत नाही.
दरम्यान, केंद्र सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. यासाठी कालच केरळला डॉक्टरांचं पथक दाखल झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी दिली. मृतांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
आणखी 25 जणांच्या रक्ताच्या तपासणीमध्ये ‘निपाह’ विषाणू असल्याचं निष्पन्न झालंय. विषाणूची लागण होऊ नये यासाठी खजूर खाणं टाळले पाहिजे, त्याबरोबरच जमिनीवर पडलेली फळं खाणं टाळावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
प्राप्त माहितीनुसार निपाह या व्हायरसची लागण पक्षी आणि प्राण्याकडून माणसांना होते. या व्हायरसची लागण होताच माणूस आणि प्राणी दोघेही गंभीर आजारी पडतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *