7d75b5c29ea207499646b74cf74501c7

रुग्णावर उपचार करताना निपाह व्हायरचा संसर्ग होऊन नर्सचा मृत्यू, पतीसाठी लिहिलं भावनिक पत्र

देश

निपाह व्हायरस झालेल्या रुग्णावर उपचार करताना संसर्ग झाल्याने केरळमधील नर्स लिनी यांचा मृत्यू झाला. आपलं कर्तव्य निभावातना जीवाचीही पर्वा न करणाऱ्या लिनी यांचं देशभरात कौतुक केलं जात आहे. निपाह व्हायरस झालेल्या रुग्णावर उपचार करताना लिनी यांनाही त्याची लागण झाली. आपला मृत्यू जवळ आला आहे, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी अजून एक मोठा त्याग केला. लिनी यांनी आपल्या पतीला पत्र लिहून, अखेरच्या दिवसांत मुलांसहित संपूर्ण कुटुंबाला दूर राहण्याची विनंती केली, जेणेकरुन त्यांना या भयंकर रोगाची लागण होऊ नये.
केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसचा फैलाव झाला असून आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील एक नर्स लिनी आहेत. लिनी यांनी मृत्यूपुर्वी केलेल्या त्यागाचंही कौतुक होत आहे. लिनी यांनी अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या कुटुंबाला दूर ठेवलं होतं. त्यांच्यावर अंत्यसंस्कारही कुटुंबाच्या अनुपस्थितीतच झाले.
लिनी यांच्या कुटुंबियांनी आरोग्य विभागाला मृतदेह घरी न आणता स्मशानभूमीत नेऊन विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यास सांगितलं होतं. लिनी यांना दोन मुलं असून सिद्धार्थ (५) आणि रितुल (२) अशी त्यांची नावे आहेत. आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये त्या साधं त्यांनाही पाहूही शकल्या नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *