doctors-strike

संपाचा तिढा सोडवण्यात सरकारला अपयश, चौथ्या दिवशी संप सुरुच

मुंबई

जे.जे. हॉस्पीटल मध्ये चार दिवसांपूर्वी निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीनंतर डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलं.जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत जेजे रुग्णालयातले निवासी डॉक्टर संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
संपकरी डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकारी यांची काल वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक झाली. यात सकारात्मक चर्चा झाली. मात्र सुरक्षेसंबंधी मागण्यांची पूर्तता प्रत्यक्षात होईपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचं संपकरी डॉक्टरांनी स्पष्ट केलं.रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डची सुरक्षा तातडीनं वाढवावी यामागणीसाठी संप कायम ठेवण्यात आला आहे.मात्र डॉक्टरांच्या या संपामुळे रुग्णांची परवड होताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन ज्युनिअर निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 11 या सर्जरी वॉर्डमध्ये हा प्रकार घडला. या मारहाणीचा व्हिडीओ ही समोर आला आहे.
या प्रकरणी मुंबईच्या जे.जे. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 353 आणि 332 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मेडिकेअर कायद्यासोबतच आरोपींवर तोडफोड करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *