Kane-Willamsons-side-eye-comeback-against-clinical-Chennai-Super-Kings-644x362

आजपासुन आयपीएलच्या प्ले-आॅफला सुरवात

क्रीडा

आजपासुन आयपीएलच्या प्ले-आॅफला सुरवात होत आहे. आज क्वालिफायर 1 चा सामना गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर असणाऱ्या सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात होत आहे.या सामन्याला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरवात होणार आहे.याआधी हे दोन संघ आयपीएलमध्ये 8 वेळा आमने सामने आले आहेत. या 8 सामन्यांपैकी 6 सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली आहे. तर सनरायझर्स हैद्राबादला 2 वेळाच विजय मिळवण्यात यश आले आहे.
तसेच, यावर्षी झालेल्या साखळी फेरीतील दोन्ही सामन्यात चेन्नईने हैद्राबाद विरुद्ध विजय मिळवला आहे. त्यांनी हैद्राबादला झालेल्या सामन्यात 4 धावांनी आणि पुण्यात झालेल्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *