death_650x400_71518037707

भाजी चांगली न झाल्याच्या रागातून झालेल्या वादात बापाने मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अटक केली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प 3 परिसरातील शास्त्रीनगर भागात शांताराम उज्जैनकर हे त्यांच्या कुटुंबासह वास्तव्यास होते. रविवारी संध्याकाळी त्यांची सून रेखाने घरी स्वयंपाक केला. मात्र त्यातली भाजी शांताराम यांना न आवडल्याने त्यांनी सुनेला शिवीगाळ करत मारहाण केली.
यावेळी त्यांचा मुलगा कृष्णा मध्ये पडला असता शांताराम यांनी त्यालाही मारहाण करत त्याचा गळा दाबला आणि तोंडावर उशी दाबून त्याचा खून केला. याप्रकरणी सून रेखाच्या तक्रारीनंतर मध्यवर्ती पोलिसांनी शांताराम विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *