doctors-strike

जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. डॉक्टरांच्या संपावर तोडगा काढण्यात चौथ्या दिवशी यश आलं. डॉक्टरांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि मार्डमध्ये तातडीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याची माहिती आहे.

चार दिवसांपूर्वी जेजे रुग्णालयातील महिला डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले होते. मात्र डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे मोठे हाल होताना दिसले. जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत संपाच्या भूमिकेवर जेजे रुग्णालयाचे निवासी डॉक्टर ठाम होते.

सरकारने लिखित आश्वासन देऊन मागण्यांसंदर्भात वर्क ऑर्डर काढली, तरच हा संप मागे घेऊ असे संपकरी डॉक्टरांचे म्हणणे होते. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या रुग्णाचं बरंवाईट झाले तर त्याला सरकारच त्याला जबाबदार असेल, असेही संपकरी निवासी डॉक्टरांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *