f43054f5dc531fbade5dd5257dcff16a

धक्कादायक ! आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

महाराष्ट्र

हिंजवडीत आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मारुंजी येथे घडली. पूजा नागनाथ वाघमारे (वय २३, रा. मारुंजी, ता. मुळशी, मुळगाव – सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत पूजा काम करीत होती. तिने सोमवारी मारुंजी येथील राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत मारुंजी परिसरातील रहिवासी सुनील अंकुश जाधव यांनी हिंजवडी पोलिसांना माहिती दिली. हिंजवडी पोलिसांनी पूजाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठविण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. हिंजवडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *