download

अधिकमासात विठ्ठल मंदिरात VIP, ऑनलाईन दर्शन बंद

महाराष्ट्र

बुधवारपासून अधिकमास अर्थात पुरषोत्तम मास सुरवात झाली आहे. दि. १६ मे ते १३ जून या महिन्याच्या कालावधीत राज्यासह इतर राज्यातून भाविक दर्शनाला येतात. या पाश्र्वभूमीवर मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे.
तीन वर्षातून एकदा येणारा अधिक मास सुरू झाला असून आज पहिला दिवस असल्याने श्री विठ्ठल आणि रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट केली आहे.
अधिक मासात दर दिवशी एक लाख भाविक पंढरपूरात दर्शनासाठी येतात. सामान्य भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी मंदीर समितीनं १६ मे पासून १४ जूनपर्यंत व्हीआयपी आणि ऑनलाईन बुकींग दर्शन सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच स्थानिक नागरिकांसाठी रोज सकाळी अर्धा तास दर्शनासाठी वेळ ठेवण्यात आली आहे. रोजच्या भाविकांची संख्या लक्षात घेता दर्शन रांगेत पिण्याचं पाणी तसेच स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *