675025-mumbai-indians-ipl-2018-afp

मुंबईचा आयपीएलमधील आव्हान कायम

क्रीडा

मुंबई इंडियन्सनं किंग्स इलेव्हन पंजाबचा तीन धावांनी पराभव करून, आयपीएलमध्ये आपलं आव्हान कायम राखलं. मुंबईनं या विजयासह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात मुंबईनं पंजाबला विजयासाठी १८७ धावांचं आव्हान दिलं होतं. लोकेश राहुलनं ९४ धावांची आणि अॅरॉन फिन्चनं ४६ धावांची खेळी उभारूनही, पंजाबला वीस षटकांत पाच बाद १८३ धावांची मजल मारता आली.
जसप्रीत बुमरानं १५ धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडून मुंबईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. त्याआधी, कायरन पोलार्ड आणि कृणाल पंड्यानं पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचून, मुंबईच्या डावाची उभारणी केली.
पोलार्डनं २३ चेंडूंत ५०, तर कृणाल पंड्यानं ३२ धावांची खेळी केली. मात्र कर्णधार रोहित शर्मा या डावातही अपयशी ठरला. तो 6 धावा करुन तंबूत परतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *