mount-everest-5666a55845448_l_835x547

आदिवासी विदयार्थ्यांनी केला एव्हरेस्ट सर

महाराष्ट्र

चंद्रपूर जिल्हयातील चार आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर करून चंद्रपूर जिल्ह्याची किर्ती राष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केली आहे.जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणारा माउंट एव्हरेस्ट सर करण्यात आज मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.
आदिवासी विकास विभागाच्यावतीने मिशन शौर्य या मोहिमेत भारताचा झेंडा एव्हरेस्टवर रोवण्यात आदिवासी विद्यार्थी- विद्यार्थ्यांना यश आले आहे. ही आनंदाची बाब असून आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण असल्याचे मंत्री विष्णु सवरा यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी या चारही जणांचे अभिनंदन केले.
एवरेस्ट सर करणाऱ्या या चार विद्यार्थ्यांचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे. शौर्य हा प्रकल्प सुरू करण्यासाठी मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला होता. चंद्रपूरसारख्या दुर्गम भागाला या मोहिमेमुळे चालना मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *