Heavy-Rain2

पुढच्या २४ तासात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

महाराष्ट्र

येत्या २४ तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केला आहे.मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर, मध्य महाराष्ट्रात अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात कालही काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती.
दुसरीकडे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *