how-evm-work

कर्नाटक विधानसभेसाठी आज मतदान, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

देश

विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी हे मतदान होणार आहे. सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.सकाळपासूनच मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. जातीय आणि धार्मिक मुद्द्यावरुन ढवळून निघालेल्या कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान सुरु रहाणार आहे. कर्नाटकमध्ये विधान सभेच्या एकूण 222 जागांसाठी मतदान होतंय. 4 कोटी 96लाख मतदार या निवडणकुीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हे मतदान ईव्हीएम मशीनवर होतंय.
या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या. त्यामुळे मतदारराजा कुणाला कौल देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 15 मे रोजी या कर्नाटकच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याप्रमाणेच कर्नाटकातील दोन दिग्गज नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमैय्या हे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत, तर भाजपने एल येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं आहे. येडियुरप्पा यांनी यापूर्वी भाजपला 2008 साली सत्ता मिळवून दिली होती.
15 मे रोजी म्हणजे मंगळवारी कर्नाटकचा गड कोण जिंकेल हे स्पष्ट होईल. कर्नाटक निवणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर काँग्रेसमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे. कारण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही लढत दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *