0452e753cf343915eb06f2f2f8ac569b

लग्नाचे वहाऱ्ड घेऊन जाणाऱ्या गाडीला भीषण अपघात

महाराष्ट्र

लातूर-नांदेड रस्त्यावर लग्नाच्या वहाऱ्डाला घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. शिरुर ताजबंद ते मुखेड रस्त्यावर आयशर टेम्पो आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता कि ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील सर्व मृत औसा तालुक्यातील खरोसा येथील रहिवासी आहेत.
खरोसा येथून नारंगे कुटुंबीयांच्या लग्नासाठी वऱ्हाड मुखेडला जात होतं. शिरुर ताजबंद ते मुखेड रस्तावर जांब गावजवळ टँकर आणि आयशर यांच्यात समोरासमोर धडक झाली.
या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही जखमी रुग्णांना जळकोट ग्रामीण रुग्णालयात, तर काहींना मुखेड, जिल्हा नांदेड येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *