himanshu-roy_20180526067

धक्कादायक ! आयपीएस हिमांशू रॉय यांची आत्महत्या

मुंबई

महाराष्ट्र पोलिस दलासाठी ही धक्कादायक बातमी आहे.राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज आत्महत्या केल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिमांशू रॉय हे दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्याच आजाराला कंटाळून हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.
हिमांशू रॉय हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. चार वर्ष मुंबई क्राईम ब्रान्चमध्ये काम केलं होतं. तर एटीएएस प्रमुख म्हणून ते अधिक चर्चेत आले.
२०१३ मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणी त्यांच्या तपासामुळेच विंदू दारा सिंगला अटक झाली होती. नंतर त्याची जामीनावर सुटका झाली.
गुन्हे विभागामध्ये काम करताना सगळ्यांना जपणारा, सहकाऱ्यांना मोकळिक देणारा व बॉडी बिल्डर ऑफिसर अशी हिमांशू रॉय यांची ओळख होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *