download

अथर्व शिंदे हत्या प्रकरण,बारा जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई

अथर्वचा मृत्यू झाला, त्या रात्री वाढदिवसाच्या पार्टीत हजर असलेल्या बर्थडे गर्लसह बारा तरुण-तरुणींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.बर्थडे पार्टीनंतर झालेल्या हत्येचं गूढ उकलण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही. आरे कॉलनीतील तलावाजवळ अथर्व शिंदेचा मृतदेह बुधवारी सकाळी सापडला होता.
रविवारी संध्याकाळी आरे कॉलनीतील रॉयल पाम्समधील बंगला क्रमांक 212 भाड्यावर घेऊन तरुणीने आपली बर्थडे पार्टी आयोजित केली होती.
ताब्यात घेण्यात आलेले सर्व तरुण उच्चभ्रू कुटुंबातील आहेत. पार्टीला आलेल्या बहुतांश तरुणांनी मद्यपान किंवा ड्रग्सचं सेवन केलं होतं, असं त्यांच्या कुटुंबीयांनीच सांगितलं आहे. मयत अथर्व शिंदेचे वडील नरेंद्र शिंदे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागात कार्यरत आहेत.
अथर्वने पुण्यातून साऊण्ड इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यानंतर तो घरुनच काम करायचा. अर्थव आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये अथर्व पार्टी असलेल्या बंगल्यातून धावत बाहेर पडत आहे, तर काही तरुण त्याच्या मागे लागल्याचं पाहायला मिळत आहे. बंगल्यापासून अर्धा किलोमीटरवर असलेल्या तलावाजवळ अथर्वचा मृतदेह आढळला होता. अथर्वला मुका मार लागला असून मृतदेहावर काही जखमा आढळल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *