karnataka-protests-over-tipu-sultan_650x400_41447144234

कर्नाटक विधानसभा मतदान, दीड लाख सुरक्षा कर्मचारी तैनात

देश

कर्नाटक राज्य विधानसभेसाठी उद्या होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनुचित घटना घडू नये तसेच मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी राज्यभरात दीड लाखहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक काळात पूर्वदक्षता म्हणून केंद्रीय सुरक्षा दलातील 585 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात एकूण 58 हजार मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यापैकी संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
13 हजार संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दलातील कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक कमल पंत यांनी दिली. सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांबरोबरच राज्य राखीव दलाच्या सर्व तुकडय़ा, जिल्हा सशस्त्र दल, औद्योगिक सुरक्षा दलाच्या सर्व तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *