684967-flipkartcomp

वॉलमार्ट कडून ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टची खरेदी

व्यापार

रिटेल उद्योग क्षेत्रातील आघाडीची अमेरिकन कंपनी वॉलमार्टने ई-कॉमर्स क्षेत्रातील भारतातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सा विकत घेण्याची घोषणा केली आहे. यामुळे फ्लिपकार्टमधील काही माजी आणि विद्यमान कर्मचारी कोट्याधीश होणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांकडे फ्लिपकार्टचे शेअर्स आहेत त्यांच्या संपत्तीमध्ये घसघशी वाढ होणार आहे.
फ्लिपकार्टच्या ३ हजार कर्मचाऱ्यांकडे कंपनीचे शेअर्स आहेत. यामध्ये माजी आणि विद्यमान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. फ्लिपकार्टमधील एकूण कर्मचारी संख्या १० हजार आहे. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि सीईओ बिन्नी बन्सल यांनी कर्मचाऱ्यांकडे असलेल्या शेअर्सचे १०० टक्के बायबॅक करणार असल्याची घोषणा केल्यानंतर कर्मचारी टाऊन हॉलमध्ये बुधवारी उत्साह दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *