expressway-main

पंतप्रधानांकडे वेळ नाही,उद्घाटन लांबवू नका, रस्ता खुला करा; सुप्रीम कोर्टाचा आदेश

देश

ईस्टर्न एक्स्प्रेस वेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नसेल, तर १ जूनपासून हा मार्ग जनतेसाठी खुला करा, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाला याबाबत डेडलाईन देत सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, ‘३१ मेपर्यंत एक्स्प्रेस-वेचं उद्घाटन झालं नाही, तर १ जूनपासून एक्स्प्रेस-वे लोकांसाठी खुला झाला असे समजले जाईल.’
दिल्लीसाठी अत्यंत महत्वाचा असलेला हा मार्ग केवळ पंतप्रधान मोदींच्या व्यस्ततेमुळे खुला झालेला नाही. यावर भाष्य करत न्यायालयाने गाझियाबाद आणि हरयाणाच्या पलवलला जोडणाऱ्या या इस्टर्न एक्स्प्रेस-वेचं लवकर उद्घाटन करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान सध्या कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत.
उत्तर प्रदेशमधून हरयाणामार्गे जाणाऱ्या जड वाहतुकीला दिल्लीत प्रवेश करण्याची गरज भासणार नाही. यासाठी इस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस-वे बनवले जात आहेत. सध्या हे सर्व ट्रक दिल्लीतून जातात. त्यामुळे दिल्ली शहरातील वाहतुकीवर मोठा ताण पडतो. इस्टर्न-वेमुळे पलवल ते कुंडली दरम्यानच्या प्रवासास पूर्वीपेक्षा निम्मा वेळ लागेल.
एक्स्प्रेसवेच्या उद्घाटनाला होत असलेला उशीर आणि त्याचा नागरिकांना होणार त्रास लक्षात घेत सुप्रीम कोर्टाने उद्घाटनासाठी ३१ मे ही डेडलाईन दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *