79ca58eb108a18cb307d560964458db1

८ लाखाचे वीजबिल आल्याने धसका,भाजीपाला विक्रेत्याची आत्महत्या

महाराष्ट्र

एका कुटुंबाला महावितरणकडून ८ लाख ६५ हजाराचे वीजबिल आले. यामुळे रोज भाजीपाला विक्रीकरून घरखर्च भागवणारे कुटुंबप्रमुख जगन्नाथ शेळके हे तणावात आले आणि यातूनच त्यांनी आत्महत्या केली.
औरंगाबाद शहरातील भारतनगर भागात राहणाऱ्या जगन्नाथ शेळके यांना महावितरणने ८ लाख ६५ हजार रुपयांचं वीज बिल पाठवलं. या बिलाचा धसका घेत जगन्नाथ शेळके यांनी टोकाचं पाऊल उचललं.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जगन्नाथ शेळके हे गारखेडा परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. पत्नी व एका मुलासह ते भारत नगर येथे राहतात. त्यांचे येथे दोन खोल्याचे पत्र्याचे घर आहे. याच घरासाठी त्यांना महावितरणकडून या महिन्यासाठी ८ लाख ६५ हजाराचे वीजबिल देण्यात आले. तसेच वीजबिल भरले नाही तर वीज खंडित करून तुमचे घर जप्त करण्यात येईल असे महावितरणकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *